marathiblogs

***ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. ब्लॉगविषयी कुठलीही तक्रार असल्यास dattahujare@gmail.com वर मेल करा. लेखक: कमलेय(दत्ता हुजरे)***


Thursday, December 22, 2011

The Indian Brand


गेल्या काही दिवसापासुन रिटेल मध्ये परकिय गुंतवणुकीचा विषय गाजत होता. अनेक जण यावर आपले मत प्रदर्शित करुन अकलेचे तारे तोडत होते पण हे मत प्रदर्शन निव्वळ भावनात्मक होते किंवा राजकिय होते.जरि आज हा मुद्दा बासनात गुंडाळला असला तरि त्याच्यावर अभ्यासक आणि चिकित्सक वृत्तीने विचार करायला हवा.एकूणच भारत ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ, अमेरिकेच्या भाषेत डंपिंग ग्राउंड(जिथे काहीही फेकलं तरि विकतं) म्हणुनच परकिय गुंतवणुकदार रिटेल क्षेत्रात करण्यात अंत्यत उत्सुक आहेत. याला सरकारकडुन अनेक कारणंही दिली गेली त्यातीलच एक शेतमालाला वाढिव भाव मिळणार, मालाची नासाडी होणार नाही वगैरे वगैरे.विरोधकांनीही किरकोळ दुकानदार उध्दवस्त होईल इत्यादी कारण देत भारत बंद(विरोधकांचे सर्वात स्वस्त ह्त्यार) केला, ज्यांच्यासाठी केला त्यांचा प्रतिसाद मूळात संमिश्र होता.काही काळ संसदही बंद होती असो.. मुळात आपण याचे फायदे तोटे बघु.