बाहेर पडणारा पाऊस आणि आत नव्या प्रेमकथेची सुरुवात सगळेच कसे जुळुन आले
होते. आता याची तगमग वाढत चालली कारण लवकरच स्टॉप येणार होता. ’तिला बाय करावे का?;
याच्या मनात विचार डोकावला, ’पण इतके सारे लोक आहेत, नको उगाच’ असा विचार करता करता
नकळत हात केसांवर फिरवण्यासाठी वर केला आणि बाय असे म्हणनारी ओठांवरची पुसट हालचाल
तिला दिसली तसे तिही ओठांवरचे हसु दाबत बाहेर बघु लागली. स्टॉपवर बस थांबली होती आणि
नाइलाजस्तव का होइना याला उतरावे लागले. ’ती हसली का असेल, आणि रिस्पॉन्स पण काहिच
दिला नाही सरळ बाहेर बघायला लागली’ नाही म्हट्ले तरी याचे मन खट्टु झाले होते. त्याला
हि गोष्ट मित्रांना विचारावी वाटली पण काय करणार हा पोहचेपर्यंत ते सिटी बसने गेले
पण होते.
Friday, September 11, 2015
Sunday, June 28, 2015
अन प्रवास इथेच संपला !!! भाग ३
सकाळी आलार्म वाजला तसे डोळे किलकिले करुन उघडत एक आळस भरला. पुन: रजाई अंगावर ओढत आज जावेच नाहि असे वाटत होते पण इतक्यात लखकन विज चमकावी तसा उठला ’अरे यार ती बस नाही मिस झाली पाहिजे हरी अप देव..... ती असेल का पण आज,.... ओय सकाळी सकाळी निगेटिव विचार नको करु असेल ती’ असे मनात व्दंद खेळत खेळत तो आवरु लागला. आज कधी नव्हे ते इतक्या लवकर आवरले.
Subscribe to:
Posts (Atom)