marathiblogs

***ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. ब्लॉगविषयी कुठलीही तक्रार असल्यास dattahujare@gmail.com वर मेल करा. लेखक: कमलेय(दत्ता हुजरे)***


Sunday, June 28, 2015

अन प्रवास इथेच संपला !!! भाग ३

सकाळी आलार्म वाजला तसे डोळे किलकिले करुन उघडत एक आळस भरला. पुन: रजाई अंगावर ओढत आज जावेच नाहि असे वाटत होते पण इतक्यात लखकन विज चमकावी तसा उठला ’अरे यार ती बस नाही मिस झाली पाहिजे हरी अप देव..... ती असेल का पण आज,.... ओय सकाळी सकाळी निगेटिव विचार नको करु असेल ती’ असे मनात व्दंद खेळत खेळत तो आवरु लागला. आज कधी नव्हे ते इतक्या लवकर आवरले.

"डबा कसा विसरतो तु" निघालेल्या देवला आईचे रोजचे पालुपद सुरु होते, डबा हातात घेत आईचा पटकन चरणसर्श करत तो स्टॅंडकडे निघाला. आज स्टॅंडवर खुप लवकर आल्यासारखे वाटत होते. सगळी आवक जावक सुरु होती., पेपरवाल्यांची लगबग, चहाच्या टपरीवर चाललेली वर्दळ, येणा‍र्‍या बस त्या भोवती गलका करणारे प्रवासी., किती तरी दिवसांनी तो असे दॄश्य निवांत पाहत होता कारण आज पहिल्यांदाच तो लवकर आला होता आणि ह्या हरवलेल्या गर्दित आपणही रोज असतो याचे त्याला कुतुहल वाटत होते. हळुहळु एक एक जण येऊ लागला, आणि गप्पांचा फड सुरु झाला अजुनही बसला यायला थोडा वेळ होता जसजसा वेळ जात होता तशी याची मात्र हूरहूर वाढली होती कसली तरी अनामिक ओढ चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती. आणि इतक्यात बस आली तशी स्टॅंडवरच्या गर्दिने बसकडे धाव घेतली. आज बस मात्र फुल झालेली दिसत होती. ’आज मोस्ट ऑप स्टॅंडींग जावे लागणार बहुधा’ मनाशी तो बोलत होता आणि तसेच झाले. तो दरवाज्याच्या जवळच उभा होता आतमधे खुपशी दाटी झाली तो तसाच थोडा पुढे सरकला आणि बस सुरु झाली. आता त्याची शोधक नजर त्याच्या ध्येयाचा ठाव घेत होती पण मधले अडथळे खुप होते. त्याची तगमग चालु होती आणि एक आवाज आला, "भाऊ साइडला हो जाऊदे मला मागं.. हं दाखव पास दाखव", कंडंक्टर पुढे जात बोलला. एव्हाना ललितला त्याची तगमग कळाली होती आणि तो हि शोधतच होता कि त्यांचे गॉसिप कॅरॅक्टर. त्याला ती सापडली आणि लगेच त्याने देवला इशारावजा खुण केली, "बॅकला., बॅकला बघ" ललित बोलला. तसे त्यानेही मागे पाहण्यास सुरुवात केली, पण काही केल्या दिसेना थोडी जागा बदलुन पाहिली पण मधल्या गर्दितुन काहि दिसेना तसा याचा चेहराच पडला शेवटि ललितच त्याला म्हणाला., "ये इकडे मी तिकडे उभा राहतो." देवने नकरार्थी मान हलवली तर त्याने "ये रे भाव नको खाऊ" बळजबरीच्या सुरात तो बोलला. शेवटि नाइलाजास्तव का होइना हा मागे अन तो दरवाज्याजवळ आला, त्यातच एक प्रवासी ओरडला., "काय चालवलं इकडुन तिकडे तिकडुन इकडे एका जागी उभं राहता येत नाही का?", तसा "सॉरि.. सॉरि ", म्हणत मागे सरकला. थोडा स्थिरस्थावर झाल्यावर याने मागे बघितले. आता मात्र टारगेट नजरेच्या टप्प्यात आले होते. याने दोनदा तिनदा तिकडे नजरेचे कटाक्ष टाकले पण तिची नजर खाली होती बहुधा पुस्तक वाचत असावी. ’शिट यार’ , याचा त्रागा सुरु झाला. ’एकदा तरी नजर वर करना........ प्लीज गॉड हेल्प मी’ असं मनात बोलता नकळत याचे हातही जोडले गेले. असाच थोडा वेळ गेला बहुधा बसने अर्धा टप्पा पार केला असावा तसे तिने पुस्तक बॅग मध्ये ठेवले आणि वर बघितले तर हा तिलाच पाहत होता नजरानजर होताच याने मान फिरवली आणि पुढे पाहु लागला. तिलाही त्याचे असे पाहणे थोडे अनपेक्षित असल्याने तिही गडबडुन खिडकीतुन बाहेर पाहु लागली. याने पुन: एक चोरटी नजर टाकली. तशी तिही खिडकित बघण्याचे फक्त दाखवत होती , अर्थात ती पण नजरेच्या एका कोन्यातुन त्याच्यावर लक्ष ठेवुन होती. आता दोघांच्या ही नजरा एकमेकांचा ठाव घेत होत्या अवतीभोवतीच्या गर्दिलाही आणि एकमेकांनाही चकवत. पण जेव्हाही तो आपल्याकडे पाहतो आहे हे लक्षात येत होते तशी तिच्या गालावर लाली पसरत होती आणि मनातुनच ती मोहरूनही येत होती.
[क्रमश]...

No comments:

Post a Comment