marathiblogs

***ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. ब्लॉगविषयी कुठलीही तक्रार असल्यास dattahujare@gmail.com वर मेल करा. लेखक: कमलेय(दत्ता हुजरे)***


Saturday, January 4, 2014

अन प्रवास इथेच संपला !!! भाग-१

***********************************************************

प्रास्ताविक : हि कथा माझ्या काही अनुभवाचा मेळ आहे. वास्तव जीवनात यातील पात्रांचा किंवा घटनेचा किंवा स्थळाचा यथातथा कोणाशी काहि संबध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.मनोरंजन हाच केवळ हेतु.......  

**********************************************************

तो प्रवास त्याच्यासाठी नविन नव्हता, नेहमीप्रमाणेच बसची वाट पहात असलेला तो.....आयुष्याची रोजची तीच तगमग. मनात घोंगावणारे विचार चेहर्‍यावर दाटुन आले होते.आजही पुन्हा कॉलेजला लेट...पहिलं लेक्चर जाणार..हम्म्म हे तर रोजचच होउन बसलय.,त्याला नेहमी वाटायचं आयुष्यात काहीच कशी एक्साइटमेंट नाही. अर्थात हेही त्याच्या मनपटलावर रोजच बिंबत होतं. तेव्हढ्यात मागुन पुढे जाणारा आमित "चल रे बस आली"  असं बोलला, तसा हरवलेला तो काहिसा भानावर येत गर्दित सरकला. आजही बसला गर्दि मग काय ’स्टॅडिंगच’ जावं लागणार."ये दरवाजा लाव रे" शेवटि चढलेल्या त्याला कंन्डक्टरने फर्मान सोडलं. बस सुरु झाली बसमध्ये सर्वच जण विराजमान झाले होते. हा जागा शोधत शोधत मागे आला सुदैवाने एक सीट खाली मिळाली अन खिडकीजवळ...... ’आईशपथ’ त्याच्या मनाने एव्हाना उसळी मारली होती., कारण खिडकीजवळ त्यांच्या रोजच्या गॉसिपमधली ’ती’... हो अहो चक्क ’तिच’ होति.
"आता काय मुहुर्त काढताय बसायला." मागुन येणारा कंन्डक्टर खेकसला तसा काहीसा घाई गडबडिने तो बसला."हं काय आहे "
"पास " पासवर ओझरती नजर टाकुन कंन्डक्टर पुढे निघुन गेला. पास तसाच खिशात ठेवत त्याची नजर शेजारिल सीटवरिल तिच्याकडे  वळली. तिचि नजर खिडकीबाहेर चाललेल्या घडामोडिवर होती. एव्हाना बस रस्त्याला लागली होती बाहेर पावसाची रिमझिम चालुच होती.आणि तिचि नजर त्या बंद खिडकीतुन बाहेर एकसारखी होती. ’काय बघतेय बाहेर काय माहित?’ याच्या मनाची चाकं पुनः फिरयला लागली. तो इतक्यात सरळ बघत होता अन हळुच एक चोरटी नजर तिच्याकडे टाकत होता. तिनं मात्र जराही नोटिस केलं नव्हतं आणि तिची इच्छाही नसणार.............कारण रोज याचे मित्र आणि हा काय कमी त्रास द्यायचे. जर ह्या सगळ्यांना मागची सीट योगायोगाने मोकळी भेटलीच तर मात्र दंगाच असायचा; ह्यांचं हसणं-खिदळणं, शेरेबाजी करणं चालुच असायचं ह्याचा बाकी कुणाला त्रास होत असेल ह्याच्यशी त्यांचं काहिही घेणंदेणं नसायचं. तारुण्याचा उन्माद काय असतो तो ह्यांच्याकडे पाहिल्यावर कळायचं. बाकी हा जवान थोडा शांत होता बाकिच्यांनी केलेल्या शेरेबाजीवर,जोक्सवर एक हलकसं स्माइल किंवा कुणी टाळी मागितली तर त्याला प्रतिसाद बाकि आपणहुन कुणाची मजा मस्करी बिलकूल नाही. हो,पण आज तो जिच्याबरोबर बसलाय तिचा विषय निघाला कि हा जाणिवपुर्वक लक्ष द्यायचा. सर्वजण तिच्याविषयी भरभरुन बोलायचे, तिचे किस्से( तिखट मीठ लावुन ), काय करते, कुठे जाते वगैरे वगैरे...... याला नेहमी प्रश्न पडायचा,हि सर्व माहिती यांना मिळते कशी. अर्थात हा आत्ताच शहरात कॉलेजला जायला लागला होता त्यामूळे थोडा नवखा होता बिचारा., ’सुंदर मुलीविषयी जगाला सर्व माहित पडतं ’ हा नियम कदाचितच त्याला माहित नव्हता असो....पण आज भाऊचं नशिब जोरवर होतं आज तिच्याच शेजारी सीटवर बसला होता आणि तिचं लक्ष नाहि पाहुन तिच्याकडे चोरटी नजरही टाकत होता. खरच सुंदर होती ती अगदी नखशिखांत म्हणुनच इतके सारे जण तिच्याकडे पहायचे, तिला इंप्रेस करायचा प्रयत्न करायचे पण ती कुणाकडे ढुंकुनही पाहत नव्हती.
याच्या मनात विचार आला ’ बोलू का हिच्याशी ’,’आयला पण लल्या(लल्या म्हणजे ललित याचा बसमधलाच मित्र) तर बोलत होता हि महाखडुस आहे म्हणुन ’ ’ चला बोलुन तर पाहु ’ मनाशी पक्कं ठरवुन तो तिच्याकडे वळला., पण पुन: पंचायत ’ नेमकं बोलयचं काय ’.त्याची हि अशी तगमग सुरु होती, तरिही बाईसाहेबांचं लक्ष बाहेरच. त्या रिमझिम सरिमध्ये बहुधा हरवुन गेली असावी. पाऊसही एकदम मन लावुन पडत होता. इकडे याला ना त्या रिमझिम सरिमध्ये इंटरेस्ट होता, ना पावसात. याचा  इंटरेस्ट जिथे होता तिथुन काहिच प्रतिसाद नव्हता. असं चालु असताना याची नजर खाली गेली, ’आईशपथ ’ आणि बोलण्याचं कारण पण सापडलं. म्हणतात ना ’प्रयत्ने रगडिता वाळुचे कण तेलही गळे’..... तर झालं होतं असं बाईसाहेबांच्या ओढणीचं टोक खाली टेकत होतं आणि पावसाचे दिवस असल्याने बस खराब झालेली, त्यातल्या त्यात हा जेव्हापासुन  आला होता तेव्हापासुन ती बाहेरच बघत होती अर्थात तिचं लक्षच नव्हतं एकंदरित. झालं आता हिची ओढणी खराब होते हे याला कसं बघवणार, ते काहिही असलं तरि याला बोलण्यासाठी मुद्दा मिळाला.पण पुनः एकदा मनाचा ’छापा-काटा’ सुरु झाला, ’बोलु कि नको’ त्याची हि अवस्था चेहर्‍यावर स्पष्ट उमटत होती अन क्षणाक्षणाला बैचेनीही...................... शेवटि मनाचा हिय्या करुन त्याने बोलायचं ठरवलच आणि............

                                                                                                                                                    [क्रमश]...


No comments:

Post a Comment