marathiblogs

***ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. ब्लॉगविषयी कुठलीही तक्रार असल्यास dattahujare@gmail.com वर मेल करा. लेखक: कमलेय(दत्ता हुजरे)***


Tuesday, January 21, 2014

अन प्रवास इथेच संपला !!! भाग २

शेवटि मनाचा हिय्या करुन त्याने बोलायचं ठरवलच आणि तिच्य़ाकाडे वळाला पण पुनः पंचायत ’हिचं नाव काय आहे’, त्याने बुध्दिवर ताण देउन आठवण्याचा प्रयत्न केला पण काहि केल्या तिचं नाव काय आहे ते आठवेना, शेवटी ’शुकशुक’ अशी साद घातली पण तिकडुन काहिच प्रतिसाद नव्हता. दोन तिनदा परत प्रयत्न केला तरिही काहिच नाही. ’हि बहिरी आहे काय,काय करु म्हणजे हि बघेल?’ असा मनात विचार घोळत असतानाच त्याने तिला हात लावला. तशी ती गर्रकन वळुन एकदम गरजलीच, "काय आहे?" इकडे मात्र जगदंबा अवतार पाहिल्यावर वाट लागली......
"ते ते ते तुझी‌‍ऽऽऽऽ तुमची ओढणी............"
म्हणत तो एकदम गार पडला, त्याने केलेल्या बोटाच्या इशार्‍याकडे तिने पाहिलं आणि ओढणी सावरत तिने स्मितहास्य करत परिस्तिथी निवळण्याचा प्रयत्न केला. इकडे मात्र तो विजेचा धक्का लागल्यासारखा झाला होता, त्याची हि भांबावलेली स्थिती पाहुन तिला थोडं हसुही आलं पण ते तसच ओठात दाबत  ती "सॉरि " म्हणाली. तसा हा थोडासा सावरला.,
"कशाबद्दल सॉरि "
"कशाबद्दल काय मी तुझ्यावर चिडल्याबद्दल. तु माझी हेल्प करत होतास आणि मी‌..."
"त्यात काय एव्हढं, पण तुम्ही चिडला का? काहि टेन्शन.."
"नाही टेन्शन नाही काहि पण तु असा अचानक हात लावलास आणि मघापासुन तु माझ्याकडेऽऽऽऽऽ " तिचा स्वर मंद होत  गेला. तो समजुन गेला तिला काय म्हणायचं ते.
" सॉरि, म्हणजे काय आहे तुम्ही बाहेर इतक्या टक लावुन बघत होत्या कि मला वाटलं काहि शोधत आहात म्हणुन " त्याने उत्तर द्यायचं म्हणुन काहि तरिच उत्तर देउन मोकळा झाला, त्याच्या या ईरसाल उत्तरावर ती मात्र दिलखुलास हसली. "मग कळालं का मी काय शोधत होते ते?" तिची नजर प्रश्णार्थक होती.तो मात्र पकडला गेल्यामुळे दाताखाली जीभ चावत होता.तर तीच पुनः त्याला समजावत म्हणाली,
"ओके ,ओके जाउदे पण असा मुलीला डायरेक्ट हात लावत जाउ नको." "नाही म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं म्हनुन, आणि तुमचं नावहि मला माहित नव्हतं. बाय द वे तुमचं नाव काय?" याने एका दमात स्पष्टिकरण देत नावही विचारलं.
" ’परिणीती’ आणि तुझं",
" ’देव’, ओके माझा स्टॉप येतोय तु इथेच उतरनार का?"
"नाहि, मी सी.बी.एस ला जातेय."
"ओके, बाय" तो सीटवरुन  उठताना म्हणाला.
"बाय", नकळत तिच्याकडुनही स्मित मिळालं.
बसच्या दरवाजाजवळ गेल्यावर पुनः त्याने मागे वळुन पाहिलं पण तिचि नजर बाहेरच्या शहरातल्या वरदळीवर गेली होती. बाहेर पाउस चालुच होता.बसमधुन उतरताना छ्त्री उघडत तो घाईघाईत निघाला पण मागुन कोणीतरी बॅगला ओढलं तसा मागे पाहिलं तर त्याचाच मित्रपरिवार. "भाउ जोरात एकदम.......अंऽऽऽऽऽऽऽ", घोरपडे गालात प्रेमाने मारत बोलला. "काय बोलली रे ती?" देशमुख त्यच्याजवळ येत बोलला.तसे सगळेच घोळका करत जमा होत प्रश्णांचा भडिमार करु लागले, पण तेव्हढ्यातच समोरुन आलेल्या सिटी बसकडे त्या गर्दिने धाव घेतली. हा परत तिथे एकटाच उरला,कारण ह्याचं कॉलेज नेमकं विरुध्द दिशेला होतं.हे आर्ट,कॉमार्स,लॉ करणारी असले तरी कॉलेजला तरी एकत्र जात होते. हा मात्र नेहमी एकटा, त्यातल्या त्यात अबोल, कुणात न मिसळणारा असा होता. थोड्याच वेळात बस आली, भरगच्च गर्दितुन हाहि एकदाचा आत गेला. बस सुरु झाली आणि याच्या मनाची चक्रही, तो घडुन गेलेला क्षण तो आता आठवु लागला.तो क्षण त्याच्यासाठी स्वप्नासारखाच होता, ’बापरे किती वसकन अंगावर आली होती,आईशपथ. पण काहिही म्हटलं तरी सुंदर आहे ती.......तिचं ते हसणं, समोर आलेल्या केसांना सावरनं, गालावर खळी पडत नसली तरी त्यावर ओसंडुन जाणारी लाली खरच अप्रतिम. परिणीती.....खरच परिच आहे तु उगाच जग थोडिच वेडं आहे तुझ्यासाठी.................................’


                                              ”अवखळ तुझी ती अदा
                                               वेड लावुन गेली मनाला
                                              क्षणात लाविसी लळा
                                              का छळतेस या पामराला"
त्याच्या कवि असलेला स्थायीभाव जागा झाला होता. तो नेहमीच असा हरवुन जायचा. आज मात्र कारण वेगळच होतं. तेव्हढ्यात बस थांबली.तसा तो पुनः या विश्वात परतला. बसमधुन उतरताना त्याने बालेकिल्ल्यावर(त्यांच्या रोजच्या कट्ट्यावर) नजर टाकली पण तिथे कुणीच नव्हतं. बहुधा लेक्चरला गेले असावेत. तो घाईघाईत कॉलेजला निघाला, त्याला हि गोष्ट मह्याला(महेशला) सांगायची होती.तसे कट्ट्यावरचे याचे खुप मित्र मात्र महेश हा खास होता.पाच-दहा मिनिटात तो क्लासच्या दरवाजपाशी येउन पोहचला, त्याचा दम भरुन आला होता.पहिल्यांदाच तिनही मजल्याचे जिने सरासर पार केले होते. लेक्चरला लेट झालं म्हनुन नाही तर कधी घडलेली गोष्ट मह्याला सांगतो असं झालं होतं. एव्हाना लेक्चर सुरु होउन पंधरा मिनिट झाले होते.तो सरांना विचारत आत घुसला आणि मागच्या बेंचवर नजर टाकली. महेश किंवा बाकी मित्र कोणीच दिसत नव्हते, ’अरे यार शीट ते कालच बोलले होते ना मॅटनी शोला जायचं म्हनुन कसा काय विसरलो मी’ कसेबसे चारहि लेक्चर केले. ब्रेक झाल्यावर पुनः बालेकिल्ल्यावर जाउन पाहिलं पण कुणीही नव्हतं. मनातली सांगण्याची खदखद तशीच राहुन गेली होती. बरं आता फोन करावा तर पुनः आपल्यालाच शिव्या बसतील म्हनुन फोनही करता येत नव्हता.’आता काय, चला घरी असंही प्रॅक्टिकला जाण्याचा मुड नाही.सगळे गेलेत मुव्ही पहायला अन आपण काय करनार एकटेच’ मनलाच समजावत तो पुनः परतीच्या मार्गाला लागला. घरि आल्यावरही मन मात्र कशातच लागत नव्हतं. रात्रीच्या जेवणात पण त्याचं लक्ष नव्हतं. शेवटी रात्र कधी एकदाची संपते आणि पुनः कधी एकदा तिला पाहतो असं त्याला झालं.अन त्या विचाराच्या गर्दितच तो झोपी गेला.
[क्रमश]...

No comments:

Post a Comment